अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटीनंतर काँग्रेस फुटीच्या चर्चांना उधाण ; बाळासाहेब थोरात म्हणाले “ते” सध्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अशोक चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चेनंतर काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचं बोललं गेलं.
याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्याबाबतचं वृत्त चुकीच्या आधारावर प्रसारित केल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त चुकीच्या आधारावर आहे. अशी कोणतीही परिस्थिती नाही. अशोक चव्हाण आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही एकत्र काम करत आहोत.
“त्या भेटीचा असा अर्थ लावणं योग्य नाही”
“अशोक चव्हाण सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रियपणे सहभागी होत आहेत. ते गणपती दर्शनाच्या निमित्ताने मित्राकडे गेले. तिथे दुसऱ्या नेत्यांची भेट झाली. म्हणून त्याचा असा अर्थ लावणं योग्य नाही. अशोक चव्हाण आणि आम्ही काँग्रेसची बांधणी करण्यासाठी काम करत आहोत आणि काम करत राहू,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.
अशोक चव्हाणांसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढ्यात मी पाहचलो. असं तर सगळ्यांचं होतं. मात्र, माझी आणि त्यांची कुठलीही भेट होत नाही.”

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…