शिंदेचा ठाकरेंना दणका ; राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पाठवल्याची बातमी समोर येत आहे.
तसेच शिंदे नव्याने 12 सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने 2020 लाच पाठवलेली यादीवर राज्यपालांनी अद्यापही मंजुरी दिली नाही.
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या जुन्या नावांची यादी रद्द समजावी असे पत्र एकनाथ शिंदे यांनी राजभवनला पाठवले आहे. शिंदे- भाजप सरकार आता नवी यादी राज्यपालांना देणार आहे. शिंदे-फडणवीसांकडे 12 नावांसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. या 12 नावांसाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता या यादीत कोणाचा समावेश होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने 12 नोव्हेंबर 2020 मध्ये १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. या यादीमध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी, रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर, यशपाल भिंगे, आनंद शिंदे , उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांचा समावेश होता. या 12 जणांचा पत्ता आता कट होण्याची शक्यता आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…