भाजपमध्ये प्रवेश , फडणवीसांसोबतची भेट ; प्रत्येक प्रश्नावर अशोक चव्हाण यांचे रोखठोक उत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई 03 सप्टेंबर :- काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असून लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
अशोक चव्हाण म्हणाले, की या सर्व गोष्टींवर मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. मी सध्या काँग्रेससोबत आहे आणि दिल्लीला जात आहे. जिथे मी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. अशोक चव्हाण भाजपमध्ये चर्चा करणार असल्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी स्वतःच आपण काँग्रेससोबत असल्याचं सांगितलं आहे.
यासोबत फडणवीसांसोबतच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. गणपती दर्शनासाठी निमंत्रण येतं आणि आपण लोकांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतो. अशात अनेकदा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होतात. मात्र, याचा अर्थ ही राजकीय चर्चा करण्यासाठीची भेट आहे असं नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
चव्हाण आणि फडणवीस यांची भेट आशिष कुलकर्णी यांच्या घरी झाल्याची तसेच त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येही काँग्रेसचे दोन माजी मंत्री शपथ घेणार असल्याची माहितीही समोर येत होती. यावरही अशोक चव्हाणांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. ते म्हणाले की ‘या सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला जास्त काही माहिती नाही आणि मला यावर काही बोलायचंही नाही. मात्र, यात माझी काहीच भूमिका नसेल, हे स्पष्ट करतो.’

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…