मनीष सिसोदिया अडचणीत ; देश सोडण्यास बंदी ; लूकआऊट नोटीस जारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मद्य धोरणामुळे अडचणीत आलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
सिसोदिया यांच्यासहीत 13 जणांविरोधात लुकआऊट नोटिस जारी करण्यात आलं आहे. तसेच सिसोदिया यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सिसोदिया यांची डोकेदुखी वाढली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मद्य धोरणातील अनियमिततेबाबत सीबीआयने शनिवारी तीन आरोपींना मुख्यालयात बोलावून जबाब नोंदवले होते. त्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये सिसोदिया यांच्यासह 15 जणांची नावे आहेत. सीबीआयने सिसोदिया यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. राजकीय सूडापोटी ही छापेमारी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
ज्या लोकांची नावे एफआयआरमध्ये आहेत, त्या सर्वांच्या विरोधात लूक आऊट नोटिस जारी करण्यात आली आहे. मात्र, यात मुंबईतील एंटरटेन्मेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर यांचं नाव नाहीये. सिसोदिया यांनी काल पत्रकार परिषद घेऊन येत्या एक दोन दिवसात त्यांची अटक होण्याची शक्यता वर्तवली होती. दिल्ली सरकार शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करत आहे. या कामांना ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळे मला येत्या दोन चार दिवस अटक केली जाऊ शकते, असं सिसोदिया यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज लुक आऊट नोटिस जारी केल्याने सिसोदिया यांना मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. लुकआऊट नोटिस जारी केल्याने सिसोदिया यांना आता देश सोडून बाहेर जाता येणार नाही. तसं केल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते.

सिसोदिया यांचं ट्विट
लुकआऊट नोटिस जारी केल्यानंतर सिसोदिया यांनी एक ट्विट केलं आहे. सिसोदिया यांनी मोदींचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यावर त्यांनी एक कॅप्शन दिलं आहे. हळूहळू वातावरण बदलतं हे माहीत होतं. पण तुमच्या वेगापुढे हवाही अचंबित आहे, असा टोला सिसोदिया यांनी मोदींना लगावला आहे.
यांच्याविरोधात एफआयआर
>> मनीष सिसोदिया, डिप्टी सीएम, दिल्ली
>> आर्व गोपी कृष्ण, तत्कालीन एक्साइज कमिश्नर
>> आनंद तिवारी, एक्साइज डिप्युटी कमिश्नर
>> पंकज भटनागर, असिस्टेंट एक्साईज कमिशनर
>> विजय नायर, CEO, एंटरटेन्मेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मुंबई
>>मनोज राय, पूर्व कर्मचारी, पेर्नोड रेकोर्ड
>> अमनदीप ढाल, डायरेक्टर, ब्रिंडको सेल्स प्रायव्हेट लिमिटेड, महाराणी बाग
>> समीर महेंद्रु, मॅनेजिंग डायरेक्टर, इंडोस्प्रिट ग्रुप, जोरबाग
>> अमित अरोरा, बडी रिटेल प्राइवेट लिमिटेड, डिफेन्स कॉलोनी
>> बडी रिटेल प्राइवेट लिमिटेड
>> दिनेश अरोरा, गुजरावाला टाऊन, दिल्ली
>> महादेव लिकर, ओखला इंडस्ट्रियल एरिया
>> सनी मारवाह, महादेव लिकर
>> अरुण रामचंद्र पिल्लई, बंगळूरु, कर्नाटक
>> अर्जुन पांडेय, गुरुग्राम फेस-3, डीएलएफ

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….