विधानसभेत फजिती झालेले तानाजी सांवत आज अक्टिव मोड मध्ये, अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना कोंडीत पकडले. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्य मंत्री सावंत देऊ शकले नाहीत.
यावरुन विरोधीमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत आरोग्य मंत्र्यांना सुनावले. विधानसभेत फजिती झालेले तानाजी सावंत आज अॅक्टिव मोड मध्ये आले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
विधानसभेत अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि तारांबळ उडाली. अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासात माहिती मिळेल असं कळवल्यानंतर अर्ध्या तासात माहिती देण्याचं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं. परंतु अर्ध्या तासात माहिती मिळणं शक्य दिसत नाही, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी सोमवारी माहिती द्या असं कळवलं.
या सर्व घडमोडीनंतर तानाजी सावंत यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय प्रकरण?
अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना तानाजी सावंत यांनी वापरलेल्या ‘फेमस’ या शब्दामुळेही सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला.
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. मात्र यानंतर अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा प्रश्न विचारला.
अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि तारांबळ उडाली. अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासात माहिती मिळेल असं कळवल्यानंतर अर्ध्या तासात माहिती देण्याचं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं. परंतु अर्ध्या तासात माहिती मिळणं शक्य दिसत नाही, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी सोमवारी माहिती द्या असं कळवलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….