विधान भवनात शिंदे गटाला मिळाले सातव्या मजल्या वर स्वतंत्र कार्यालय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. सत्तांतर झाले असले तरी शिंदे गटाने आम्हीच शिवसेना असा दावा कायम ठेवला आहे. आता विधानभवनात देखील शिंदे गटाला सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय मिळाले आहे.
शिवसेनेचे आधीचे चौथ्या मजल्यावरील कार्यालय कायम आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावर आहे. शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. त्यावेळी शिंदे गटाला विधिमंडळ पक्ष कार्यालय मिळाले नव्हते. चौथ्या मजल्यावरील शिवसेनेच्या कार्यालयाला त्यावेळी कुलुप लावण्यात आले होते; मात्र आता शिंदे गटाला विधानभवनाच्या सातव्या मजल्यावर कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे आता चौथ्या मजल्यावर शिवसेनेचे तर सातव्या मजल्यावर शिंदे गटाचे कार्यालय राहणार आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….