उद्धव ठाकरे देणार नाहीत आमदारकीचा राजीनामा ; संख्याबळ कायम राखण्यासाठी निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.
मात्र, त्यांनी प्रत्यक्ष सभापतींकडे राजीनामा दिलेला नव्हता. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हा राजीनामा न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. विधान परिषदेतील शिवसेनेचे संख्याबळ कमी होऊ नये यासाठी शिवसेना पक्ष कार्यकारिणीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सभापतिपदाच्या निवडणुकीत संख्याबळ महत्त्वाचे
विधान परिषदेचे सभापतिपद रिक्त आहे. या पदासाठी निवडणूक लागली तर महाविकास आघाडीकडे जास्त संख्याबळ असावे या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका घेण्यात आल्याचे समजते.
काँग्रेसच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. विधान परिषदेत सध्या भाजपचे २४ आमदार आहेत. तर महाविकास आघाडीकडे शिवसेना १२, काँग्रेस १० आणि राष्ट्रवादी १० असे ३२ चे संख्याबळ आहे.
७ अपक्ष आमदार असून, यातील ३ जण महाविकास आघाडीसोबत आहेत. राज्यपाल नियुक्त रिक्त असलेल्या १२ जागा भरण्यापूर्वी सभापतिपदाची निवडणूक लागली तर सध्याच्या संख्याबळाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकेल. मात्र शिंदे-भाजप युतीकडून या १२ जागा भरल्या गेल्या आणि त्यानंतर ही निवडणूक लागली तर त्याचा फायदा शिंदे-भाजप गटाला होणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..