काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.
दरम्यान, सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेट झाल्या आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आता सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयराम रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जूनमध्येच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होते. आता दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या आयसोलेट झाल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना देखील पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: प्रियांका यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट करुन ठेवले आहे. दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देखील अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी अलवर दौरा रद्द केला होता. सोनिया गांधी यांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. तर प्रियंका गांधी यांना देखील दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. 2 जून 2022 ला सोनिया गांधी यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..