पुसद मध्ये निघणार भव्य तिरंगा रॅली : रॅलीत जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे राष्ट्रप्रेमीचे आवाहन!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुसद मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले आहे.ही रॅली सकाळी साडेनऊ वाजता मोती नगर येथील दत्त मंदिरातून निघून रॅली वसंतराव नाईक चौक,मुखरे चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मार्गक्रमण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत मातेच्या आरतीने रॅलीचा समारोप होईल. रॅली ही पायी असणार आहे.रॅलीत तीन ओपन जिप्सी राहणार असून त्यात भारतमाता असेल.तसेच देशभक्तीपर गीते वाजवल्या जातील हा पैदल मार्च शिस्तीत जाणार असून तिरंगा हातात घेऊन या रॅलीमध्ये फक्त वंदे मातरम, भारत माता की जय, हर घर तिरंगा घर घर तिरंगा हे नारे लावण्यात येणार आहेत. ही रॅली कोणत्याही राजकीय संघटना अथवा इतर संघटनाची राहणारं नसून ही रॅली सर्व राष्ट्रप्रेमीची राहील.या रॅलीत तिरंगा झेंडा घेऊन पारंपारिक वेशभूषा करून अथवा पांढरे कपडे घालून यावे. नसल्यास इतर नेहमीच्या वेषात सुद्धा येता येईल.

योग भवन येथे झालेल्या सभेमध्ये राष्ट्रप्रेमी यांनी या रॅलीत जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आहे. या सभेत शहरातील विविध मान्यवर तथा राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तसेच या रॅलीत राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याने याचे भान ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..