शिवसेनेला निवडणूक आयोगाचा धक्का….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला पुरावे गोळा करण्यासाठी आधी 4 आठवड्यांची मुदत दिली होती.
मात्र निवडणूक आयोगाने या मुदतीत जवळपास 13 दिवसांनी कमी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला कमी दिवसात आता कमी दिवसांमध्ये पक्षाबाबत कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.
राज्यात गेल्या अनेक दिवस सत्तासंघर्ष चालला. त्यानंतर नवं सरकार स्थापन झालं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ या चिन्हावर आपला दावा ठोकला. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले.
धनुष्यबाण कोणाचं, असा पेच निर्माण झाला. वाद टोकाला पोहचला. धनुष्य बाण कोणाचं, हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला. तसेच हा विषय अजून न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता न्यायलयाने शिवसेनेला 4 आठवड्यांऐवजी 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर लवकरात लवकर कागदपत्र जमा करुन ती आयोगासमोर सादर करण्याचं आव्हान असणार आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….