महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापुरात “एमआयएम” ला धक्का ; 6 नगरसेवक जाणार राष्ट्रवादीत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- राज्यात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यातच इच्छुक उमेदवार आपल्या वॉर्डमध्ये मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करताय.
तर तिकीट मिळवण्यासाठी देखील रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. यातच आता पक्षप्रवेशाच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. महापालिका समोर ठेवून हे डावपेच आखले जात असल्याची चर्चा आहे, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असतानाच एमआयएम या पक्षाला (MIM) मोठं खिंडार पडलं आहे. सोलापुरातील एमआयएमचे तब्बल सहा नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) प्रवेश करणार आहेत. नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सहा नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे सोलापुरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….