देशाचे 14 वे उपराष्ट्रपती घेणार आज शपथ ; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू देणार आज शपथ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार आहेत.
त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देणार आहेत. तर विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला. त्यानंतर जगदीप धनखड यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मार्गारेट अल्वा यांचा पराभव
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे, त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले. या खासदारांच मतदान पार पडून हा निकाल जाहीर झाला. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनखड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. त्याचवेळी 15 मते रद्द करण्यात आली. उपराष्ट्रपतीपदासाठी 92.94 टक्के मतदान झालं.
धनखड यांची कारकिर्द
जगदीप धनखड यांची कारकिर्द पाहता, 1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 1991 मध्ये धनखड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनखड यांची जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनकड यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. धनकड हे क्रीडाप्रेमी म्हणूनही ओळखले जातात

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….