“भाजप मित्र पक्षाला हळूहळू संपवतो” ; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर म्हणाले , शरद पवारांचे दुःख वेगळं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप मित्र पक्षाला हळूहळू संपवतो, असा हल्लाबोल शरद पवार यांनी धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही, असे म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढा असं सुनावलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी पक्ष बदलला तेव्हा कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा, कोणालाही कसेही बदलता येतात. आज कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे, ती एकनाथ शिंदे आणि शिवसेना करत आहे, असे म्हणत शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेल्या पक्षातील चिन्हाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. एका वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमच्याकडे 115 आमदार आहेत, आमच्या मित्र पक्षाकडे 50 आमदार आहेत. तरीही आमच्यासोबतच्या पक्षाला मुख्यमंत्री केलं.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.
पवारसाहेबांचं दु:ख जरा वेगळं आहे. ते आपल्या सर्वांनाच माहितीय, असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
खातेवाटपाआधी फडणवीसांची गुगली
मंत्र्यांचं खातेवाटप कधी होणार असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांना विचारलं असता ते तर तुम्हीच करुन टाकलंय अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
माध्यमांनीच खातेवाटप करुन टाकले आहे.
आमच्या करता खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही.
पुण तुम्ही जे खातेवाटप केलं ते सपशेल चुकीचं ठरेल एवढे मी नक्की सांगतो असं सांगत तुमचे अंदाज पूर्णपणे चुकणार असल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….