नागपूर साठी “सब कुछ” ; मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून एकालाही स्थान नाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- मंत्रिमंडाळाच्या विस्तारात आपला नंबर लागावा यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या एकाही नेत्याला देव पावला नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऐकमेव मंत्री राहणार आहेत.
भाजपचे केवळ नऊ मंत्री असल्याने नागपूरचे पालकमंत्रीसुद्धा फडणवीस हेच राहतील, अशी शक्यता आहे. भाजप-सेना युतीच्या काळात देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना कामठीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि अबकारी अशी दोन महत्त्वाची खाती होते. याशिवाय परिणय फुके यांच्या रूपाने एक राज्यमंत्रीसुद्धा उपराजधानीला लाभला होता.
मात्र, शिंदेसेना आणि भाजपच्या दुसऱ्या कार्यकाळात फडणवीस यांचा अपवाद वगळता नागपूर जिल्ह्यातील एकाही नेत्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे समर्थकांमध्ये थोडी नाराजी आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने शहरातील एक किंवा दोन नेते मंत्रिमंडळात दिसतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. नागपूर जिल्ह्यातून चंद्रशेखर बावनकुळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे तसेच हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यापैकी कोणाचा तरी समावेश होईल, असे भाजपच्याच नेत्यांचे म्हणणे होते.
जिल्ह्याचे राजकीय नुकसान
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात नागपूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री लाभले होते. नितीन राऊत यांना ऊर्जा तर सुनील केदार यांनी पशुसंवर्धन व क्रीडा खाते सोपवण्यात आले होते. भाजपच्या काळातही फडणवीस यांच्यासोबत बावनकुळे होते. यंदा फडणवीस हेच एकमेव मंत्रिमंडळात असल्याने नागपूरचे नुकसान झाले आहे. भाजपच्या कार्यकाळात भंडारा, गडचिरोली, अमरावती, अकोला या विदर्भातील जिल्ह्यांनाही मंत्रिपद देण्यात आले होते.
श्रद्धा व सबुरी
विधान परिषदेच्या आमदारांना मंत्री करायचे नाही, असे भाजपने ठरवल्याचे दिसते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री परिणय फुके, प्रवीण दटके यांना नंबर लागला नाही. मात्र, कृष्णा खोपडे तीन तर समीर मेघे दोनवेळा विधानसभेत निवडून आले आहेत. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्र्यांचाच समावेश आहे. आणखी किमान तीस जणांना सामावून घेतले जाणार असल्याने अनेकांच्या आशा कायम आहेत. खोपडे आणि समीर मेघे यांची नावे त्यात राहतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वांना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….