कार्यालये नकोत कामेही करा ; विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- ‘महापालिकेची तीन सदस्यीय प्रभागरचना रद्द करण्यात आली आणि चार सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, फेब्रुवारीच्या आसपास निवडणुका होतील.
मात्र, कोणी न्यायालयात गेल्यास न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज राहा, केवळ कार्यालये थाटू नका…तर जनतेची कामेही करा,’ अशा सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ता येते आणि जाते. राज्यात आताही सत्तेत बसलेले सत्तेवर किती काळ राहतील, हे सांगता येत नाही. आगामी काळात जि.प., प.स., नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. त्यात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रवादीने केलेल्या प्रयत्नाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळाले.
दिल्लीचा ग्रीन सिग्नल हवाच
राज्यात शिंदे सरकार येऊन 36 दिवस उलटले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौर्यावर आहेत. मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. खातेवाटप कधी, हा प्रश्न केला की ते फक्त लवकरच इतकी प्रतिक्रिया देतात. दिल्लीवरून जोवर ग्रीन सिग्नल मिळत नाही, तोवर काहीच होणार नाही. यांच्या हातून काहीही घडणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
राज्यात सुव्यवस्था राखणे गृहमंत्र्यांचे काम
भान येथे एका महिलेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मावळ तालुक्यातही एक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्याची सुव्यवस्था राखणे, हे गृहमंत्र्यांचे काम असते. राज्याला गृहमंत्री नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याची दखल घेऊन कोणाकडे तरी ही जबाबदारी सोपवावी आणि महिलांना सुरक्षितता द्यावी.
– रूपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…