देवेंद्र फडणवीस यूपी चे उपमुख्यमंत्री , गुगलला झालं काय…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 07 ऑगस्ट :- महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरीस भाजप सरकार आणून दाखवले आहे.
पण, भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली. पण, आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री नसून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचा जावईशोध गुगलने लावला आहे. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आपण सहज गुगलचा वापर करतो. पण, ती माहिती खरी असेलच याची खात्री आता केली पाहिजे. कारण, गुगलवर देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्च केले असता उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश असा उल्लेखच आढळून आला आहे.
गुगलवर जेव्हा एका राजकीय नेता, अभिनेत्याची माहिती सर्च केली जाते तेव्हा त्याच्या लोकप्रियतेनुसार, त्याच्या पदासह गुगलकडून प्रोफाईल तयार केलेली असते. उजव्या कोपऱ्यामध्ये फडणवीस यांचा फोटो आणि त्याखाली पद लिहिले आहे. पण, ते उपमुख्यमंत्री उत्तरप्रदेश असा उल्लेख आहे. आता फडणवीस हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, मग उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री कधी झाले, असा सवाल उपस्थितीत झाला.
याच प्रोफाईल खाली फडणवीस यांची विकिपीडिया आहे, यामध्ये मात्र ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे नेमकं गुगलला झालंय काय?असा सवाल उपस्थितीत झाला आहे. विकिपीडिया शक्यतो कुणीही अपडेट करू शकतो. पण, एवढ्या मोठ्या सर्च इंजिनवर एका व्यक्तीचे पद कसे चुकू शकते, जी राज्याची उपमुख्यमंत्रिपदी विराजमान आहे.
याआधीही गुगलकडून अशा बऱ्याच चुका झालेल्या आहे. कधी भारताचा मॅप चुकीचा दाखवला आहे. तरी कधी कुणाचे नाव चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे गुगल सगळंच काही खरेच सांगत असेल तर जरा विचार करा.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…