केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
केदार दिघे यांच्याविरोधात मुंबईत बलात्कार पीडितेला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, याप्रकरणाच्या तपासात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता पडेल तेव्हा सहकार्य करण्याची अट हायकोर्टाने घातली आहे.
मुंबईतील ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका 23 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिला ह्या खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर म्हणून काम करतात. मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना क्लबच्या मेंबरशिपबाबत माहिती देण्याचे काम करतात. केदार दिघे यांच्या मित्राने 28 जुलै रोजी सेंट रेजीस हॉटेलमध्ये मेम्बरशीप घेण्याच्या बहाण्याने जेवणासाठी बोलावले होते. त्यानंतर क्लब मेम्बरशीपचे पैसे देण्यासाठी रुममध्ये थांबण्यास सांगितले. त्यानंतर रोहित कपूरने बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.
या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यानंतर 31 जुलै रोजी पीडित महिलेने आपल्यावर बेतलेला प्रसंग तीन मित्रांना सांगितला. पीडितेने रोहित कपूरला व्हॉट्सअॅपवर याबाबत जाब विचारला. रोहित कपूरने पीडित महिलेला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले.
केदार दिघे यांचा संबंध काय?
त्यानंतर एक ऑगस्ट रोजी पीडित महिलेने आपल्या मित्रांमार्फत आरोपीला विचारणा केली. मात्र, आरोपी रोहित कपूरने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपी रोहित कपूर याने त्याचा मित्र केदार दिघे याच्या मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने याला नकार दिला. या नकारानंतर केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप आहे. त्यानंतर, ,आता तक्रारदार महिलेने दिलेल्या जबावावरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपी रोहित कपूर व कंदार दिघे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…