पीएम मोदींनी डीपीला लावला तिरंगा ; “हर घर तिरंगा” या उपक्रमासाठी जनतेला ही केलं आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे ‘प्रोफाइल’ फोटो बदलून डीपीवर तिरंगा लावला आहे. खरं तर, आकाशवाणीच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या 91 व्या आवृत्तीत देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उल्लेख केला होता आणि लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा ‘प्रोफाइल’ फोटो बदलण्यास सांगितले होते.
2 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. त्याच वेळी, आज (2 ऑगस्ट) रोजी, पंतप्रधानांनी तिरंगा त्यांचे ‘प्रोफाइल’ फोटो म्हणून ठेवले आहे.
यावेळी पंतप्रधानांनी एक ट्विट देखील केले आणि लिहिले की, “आज 2 ऑगस्टचा दिवस खास आहे! अशा वेळी जेव्हा आपण आपला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपला देश #HarGharTirangaसाठी तयार आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ही एक सामूहिक चळवळ आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांनीही असे फोटो ठेवा असं मी आवाहन करतो.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा ‘प्रोफाइल’ पिक्चर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले होते. यासोबतच त्यांनी लोकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी’ अमृत महोत्सव एक जनआंदोलन बनला आहे आणि लोकांनी 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘प्रोफाइल’ पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचे आवाहन केल्यानंतर शहा यांचे हे आवाहन आले आहे.
केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत या महिन्यात तीन दिवस देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. कार्यक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत लोकसहभागातून घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून सरकारी आणि खाजगी आस्थापनेही यात सहभागी होणार आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…