तक्रार घेवून येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तर द्यावे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे ; लोकशाही दिनात 148 तक्रारी प्राप्त…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 2 ऑगस्ट :- लोकशाही दिनात सादर झालेल्या तक्रारींचे अनुपालन कार्यालय प्रमुखांनी तात्काळ करावे व तक्रार घेवून येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तर द्यावे तसेच यापुढे एक महिण्यापेक्षा जादा कालावधीपर्यंत तक्रारी प्रलंबित राहील्यास संबंधीत कार्यालय प्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकशाही दिनात सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व इतर कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 148 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील लोकशाही दिनापुर्वी करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…