राऊतांच्या अटकेचे पडसाद राज्यसभेत ; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री उशीरा सक्तवसुली संचलानालयाने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. काल दिवसभर त्यांची ईडीच्या तब्बल १० अधिकाऱ्यांकडून चौकशी चालू होती.
त्यांच्या अटकेनंतर राज्यसभेतही पडसाद उमटू लागले आहेत. राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून भाजपवर ताशेरे ओढले जात आहेत. त्याचबरोबर शिवसेना खासदारही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे काही वेळासाठी राज्यसभेचे आणि लाकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन चालू असतानाच खासदार संजय राऊतांना अटक झाल्यामुळे शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेतील कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे. त्याचबरोबर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत असून सगळे सत्ताधारी धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, काल पहाटेच खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले होते. ईडीचे तब्बल १० अधिकारी आणि काही कर्मचारी राऊतांच्या घरात दिवसभर तळ ठोकून होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी करत घोषणाबाजी केली होती. त्यानंतर अखेर नऊ तासांच्या सखोल चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर काल रात्री उशीरा त्यांना अटक केली आहे. त्यानंतर भाजपवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली असून याचे पडसाद राज्यसभेतही दिसून आले आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…