औरंगाबाद नामांतराचा निर्णय बदलण्या बाबत मुख्यमंत्री शिंदेचे मोठे विधान , म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- राज्याच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तो निर्णय बदलणे अशक्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष कृती समितीला सांगितले.
औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शिंदे यांची सुभेदारी विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने औरंगाबादचे नामांतर करण्यात येऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. औरंगाबादच्या नावाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्य सरकारने नामांतराचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नामांतराचा निर्णय बदलणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…