बंडखोर खासदार धैर्यशील मानेच्या घरावर कट्टर शिवसैनिकांचा मोर्चा ; घराला पोलीस छावणीचे स्वरूप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याच्या आरोपातून शिवसैनिकांनी आज,सोमवारी खासदार धैर्यशील माने यांच्या येथील रुईकर कॉलनीतील घरावर मोर्चा काढला आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार माने यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे रुईकर कॉलनी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
खासदार माने दिल्लीत असून त्यांच्या निवासस्थानी मोजकेच कार्यकर्ते बसून आहेत. जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी शिवसैनिकांकडून माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्तांतर झाले. यानंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सेनेत दोन गट पडले आहेत. यातच कोल्हापुरातील खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे देखील शिंदे गटात सामील झाले. यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले. पक्षाने सर्वकाही देऊनही गद्दारी का केली, अशी विचारणा करत आज, शिवसैनिकांनी माने यांच्या घरावर मोर्चा काढला आहे. मात्र, त्याआधीच माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….