ठाकरेंची की शिंदेंची शिवसेना कोणाची…? ; वाद आता निवडणूक आयोगाकडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. सत्तास्थापनेनंतर अनेकांनी शिवसेनेची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात जाण्यात धन्यता मानली.
शिंदेंनी जवळपास शिवसेना हायजॅक केल्याची चर्चा सुरु झाली. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा सांगितला. त्यामुळे शिवसेना कुणाची या वादाला तोंड फुटलं. अखेर हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे.
निवडणूक आयोगाने या वादावरुन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करायला सांगितले आहेत.
निवडणूक आयोगाने हे कागदपत्र सादर करण्यासाठी दोन्ही गटांना 8 ऑग्स्टपर्यंतची मुदत दिली आहे. या दोन्ही गटांना 8 ऑग्स्टला दुपारी 1 पर्यंत हे पुरावे सादर करायचे आहे. त्यामुळे आता या दोन्ही गटाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून असणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…