शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला खिंडार पडलंय. आमदारांनंतर विविध महापालिकेतील नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
आता तर शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा सांगितलाय. त्यामुळे शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान झालंय. संघटनात्मक पातळीवरही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी उद्धव यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.
उद्धव ठाकरे या महाराष्ट्र दौऱ्यात पक्षाला मजबुत करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरणार आहेत. संघटनात्मक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावेही घेणार आहेत.
मातोश्रीवर बैठकींचा सपाटा
दरम्यान राज्यातील राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे सातत्याने मातोश्रीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह बैठका घेत आहेत. त्यामुळे आता ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…