योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय ; उत्तर प्रदेशात 15 ऑगस्टची सुट्टी रद्द…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टची सुटी रद्द करण्यात आली आहे.
सुटी रद्द करण्यात आल्याने 15 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशात (up) शाळा, महाविद्यालय, बँका, सरकारी आणि खासगी कार्यालये सुरूच राहणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ सरकारने स्वातंत्र्य दिनाची सुटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने 15 ऑगस्टची सुटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत या दिवशी उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्टदरम्यान उत्तरप्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचा बुस्टर डोस मोफत
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गेले वर्षभर केंद्र सरकारच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अमृतमहोत्सवानिमित्त पुढील 15 दिवस केंद्राच्या वतीने कोरोनाचा बुस्टर डोस मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात तर जय्यत तयारी सुरू आहे. नागरिकांमध्ये उत्साह दिसून येतोय. 12 जुलै रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी त्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
देशभरात 15 ऑगस्टची जोरदार तयारी सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने विविध राज्यात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. गेले वर्षभर केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन हा देशभरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…