पुसद शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन करणार ; अखिल भारतीय नौजवान सभेचा निवेदनाद्वारे नगर परिषदेला आंदोलनाचा इशारा……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीयअवस्था झाली आहे. लोकांना रस्त्याने दुचाकीवरून किंवा पायी चालताना सुध्दा रस्त्यावरील खड्डयांचा सामना करत मार्गक्रमण करावं लागत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच चौकातील रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येने खड्डे पडल्याचे आढळून येत आहे. पावसाळ्यापूर्वी नागरपालिकेकडून रस्त्यांची दुरुस्ती होणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला शिवाय मागील एक आठवडाभर पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. पुसद शहरातील रस्ते खड्डेमय झाले असल्याने सगळीकडे पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून चालतांना अडचणी येत आहेत. तसेच हे रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. शहरातील या समस्येची दखल घेऊन अखिल भारतीय नौजवान सभा पुसद च्या कार्यकर्त्यांनी दि. 15/07/2022 रोजी मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदन देऊन शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय नौजवान सभेचे जिल्हासचिव निखिल टोपलेवार, तालुकाध्यक्ष समाधान बळी , गणेश भुजाडे , किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र गडदे, अरविंद शेळके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….