द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल होताच स्वागतासाठी आदिवासी बांधवांनी सादर केलं नृत्य…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रपतिपदाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू प्रचारासाठी आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ‘हॉटेल लीला’ येथे त्या भाजप तसेच सहयोगी आमदार-खासदारांना संबोधित करणार आहेत दरम्यान यापूर्वी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला हॉटेल लीला येथे आदिवासी बांधवांकडून पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
यावेळी आदिवासी समाजाची सांस्कृतीक प्रतिकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तू यावेळी मुर्मू यांना भेट देण्यात आली. यावेळी भाजपचे नेते, आमदार आणि खासदार यावेळी उपस्थितीत होते. मुर्मू या राष्ट्रपतीपदासाठी NDA च्या उमेदवार आहेत, त्यांची विशेष ओळख म्हणजे त्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला आहेत ज्यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आज मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप आणि शिंदे गटाचे अनेक नेते उपस्थित होते.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १८ तारखेला होणार आहे. दरम्यान कॉंग्रेसकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मुर्मू यांना पाठिंबा घोषित केला आहे. मात्र मुर्मू या ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता कमी झाली आहे. द्रौपदी मुर्मू या आरिसातील आदिवासी नेत्या आहेत, तसेच यापूर्वी त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….