सतर्क : कोणत्याही क्षणी अधरपुस प्रकल्पाचे दरवाजे उघडणार ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
अधरपुस प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने धरण सुरक्षतेच्या दृष्टीने येत्या ७२ तासात कोणत्याही क्षणी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात येणार आहे.त्यामुळे पुस नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्याला आला होता.त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.त्यानुसार अतिशय मुसळधार पाऊस सकाळ पासून सुरू आहे.त्यामुळे अधरपुस प्रकल्पाची पातळी वाढली आहे. अधर पुस प्रकल्पाची पातळी ३०३.६१मी व जिवंत साठा २८.८५ द.ल.घ.मी. झालेला आहे.त्याप्रमाणे धरणात नियोजित नुसार पाणी पातळी पेक्षा जास्त वाढ होत असल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने जलाशयामध्ये येणाऱ्या पाण्यामुळे ७२ तासात कोणत्याही क्षणी धरणाचे २ दरवाजे उघण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग यांनी जिल्हाधिकारी यांना कळविले आहे.त्यानुसार पुस नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….