आंदोलक आक्रामक श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रम सिंह यांचे खासगी घर पेटवले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलंबो :- श्रीलंकेतील आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घराची तोडफोड केली आणि त्याला आग लावली आहे.
गोताबाया सरकारने राजीनामा द्यावा या मागणीसाठी श्रीलंकेतील नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे.

आंदोलकांना पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. नंतर या घराला त्यांनी आग लावली. तसेच या परिसरातील गाड्यांचं नुकसान केलं.
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली असून देश मोठ्या संकटाला तोंड देत आहे. महागाईने उच्चांक गाठला असून देशावर कर्जाचा भलामोठा डोंगर उभा राहिला आहे. देशात अन्नधान्याचा मोठा तुडवडा निर्माण झाला असून त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या गोताबाया सरकारविरोधात जनक्षोभाचा भडका उडाला असून याला आता हिंसक वळण लागलं आहे.
रानिल विक्रमसिंघे यांनी मे महिन्यामध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाने नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी, दोघांनाही संयम राखण्याचं आणि शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….