संजय राऊतांना मोठा दणका ; शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना नेते संजय राऊत यांना खूप मोठा दणका शिवडी कोर्टाने दिला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारीनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले.
महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…