“नेता असावा तर असा” ; रस्त्यात ताफा थांबवून अपघातग्रस्ताला राहुल गांधींनी केली मदत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडच्या दौऱ्यावर आहेत.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडच्या दौऱ्यावर आहेत.
केरळमध्ये राहुल गांधींचा तीन दिवसांचा दौरा असणार आहे. ते शुक्रवारी वायनाडमध्ये दाखल झाले आहेत.

एकता संमेलनात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी वंदूर इथं पोहोचले होते. या कार्यक्रमातून परतत असताना वाटेत अपघात झालेल्या व्यक्तीला राहुल गांधींनी त्यांचा ताफा थांबवत अपघातग्रस्ताला मदत केली. एवढंच नाही, तर गांधींनी त्या अपघातग्रस्ताला आपल्या ताफ्यात धावणाऱ्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात एका अपघातग्रस्ताला मदत केली. शिवाय, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली. पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन गांधी हॉटेलकडं परतत असताना रस्त्यात मोटारसायकलनं एका व्यक्तीला धडक दिली होती. यावेळी अपघातग्रस्त व्यक्ती मदतीची अपेक्षा करत असताना राहुल गांधींनी आपला ताफा थांबवत त्याला मदत केली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेता स्थानिक गर्दीच्या मधोमध उभा राहून एका अपघातग्रस्ताला रुग्णवाहिकेत बसवताना दिसत आहे. अपघातातील व्यक्तीचं नाव अबुबकर असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….