आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला गैरहजर……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आणि त्याला शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी दिलेली साथ यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही तासांतील घडामोडींमुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर दुपारी एक वाजल्यापासून मंत्रालयात मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीला आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक प्रमुख मंत्री अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे या अनुपस्थितीमागे नेमकं कारण काय याची चर्चा होत आहे.
कोरोनाची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. मात्र आदित्य ठाकरे, दादा भुसे, सुभाष देसाई, उदय सामंत हे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित आहेत.
दरम्यान, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्य़े कोणता महत्त्वाचा निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच काही वेळापूर्ण विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट केल्याने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा काही निर्णय होतो का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…