“भाजपाला मतदान करू नये म्हणून अटकेचा प्रयत्न” ; रवी राणा यांच्या उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीने दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. मी भाजपाला मतदान करू नये, म्हणून महाविकास आघाडीने मला अटक करण्यासाठी मुंबई आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारित केलेल्या व्हिडीओतून हा आरोप केला आहे.
रवी राणा म्हणाले की, “राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत.”
विशेष म्हणजे, आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. हा वॉरंट आमदार राणा यांना देण्यासाठी राजापेठ पोलीस शनिवारी रवी राणा यांच्या मुंबईतील घरी पोहचले होते. पण राणा दाम्पत्य सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत.
नेमकं प्रकरण काय?
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांविरुद्ध जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आमदार राणा यांना त्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. हाच अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….