ताडोबातील सर्वात वयोवृद्ध वाघडोह वाघाचा मृत्यू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपुर (ताडोबा) :-
अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून वाघाडोह वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. १७ वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड झाले होते.हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. वयस्कर असल्याने त्याला शिकार करणं अशक्य होतं. तसंच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडलं होतं. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होता.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…