पारंपरिक आहेर न स्विकारता,धरतीला हिरवा शालू नेसवून लग्न सोहळा संपन्न…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- निसर्गाचा ढासळता समतोल राखण्यासाठी आपल्या मुलाच्या लग्नापूर्वी पारंपारिक आहेर न स्वीकारता नातेवाईक व मित्रमंडळी व सामाजिक संघटने कडून एका वृक्षाच्या आहेराची मागणी करून सामाजिक व पर्यावरणा विषयी कार्य करणाऱ्या शिवप्रभा ट्रस्ट पुणेचे कोषाध्यक्ष परशराम नरवाडे यांनी केली, या लग्नसोहळ्या करिता जवळपास दीडशे झाडांचा आहेर सौ संगिता व परशराम नरवाडे या दाम्पत्याचा मुलगा सोहम व उमररखेड तालुक्यातील बारा येथील सौ वंदना व जनार्दन काळे यांची सुकन्या शिवानी काळे यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला, लग्न म्हटले की लग्नपत्रिका,मंगल कार्यालय, डीजे, फटाके,हा वायफळ खर्च न करता, नातेवाईक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनाना आहेर न आणता, दहा ते पंधरा फुटाचे झाड व त्याला लागणारा खर्च असे एकूण एक हजार रुपये आहेर म्हणून घेऊन, हा आगळा वेगळा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात नरवाडे यांच्या घरी मायभवन पुसद येथे पार पडला या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…