ईडीची पीडा टाळण्यासाठी सभा ; धनंजय मुंडेची राज ठाकरेंवर टीका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद बहुचर्चित सभा सायंकाळी होत आहे. त्यावर टीका होत आहे. राज ठाकरे यांची आजची सभा भाजप पुरस्कृत असून ईडीची पीडा टाळण्यासाठी ते सभा घेऊन भाजपला खूश करत असल्याची टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Raj Thackeray) यांनी केली.
ठाकरे पूर्वी केंद्र सरकारविरोधात आणि आता महाविकास आघाडीविरोधात सभा घेत आहेत. त्याचा काहीही फरक पडणार नाही. मात्र स्वतःच काही तरी झाकण्यासाठी अशा सभांचं आयोजन केले जात असल्याचा टोला मुंडे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे. राज ठाकरे यांची सभा म्हणजे स्वतःच काहीतरी झाकण्यासाठी आहे.
आधी ठाकरे केंद्र सरकारविरोधात बोलत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना देशाच्या राजकीय पटलावरुन हटवले पाहिजे, अशी मागणी करणारा माणूस आज त्यांचेच गुणगाण गात आहेत. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. राज ठाकरेंची आज होत असलेली सभा भाजप पुरस्कृत आहे. ते काही नव्याने सांगण्याची गरज नसल्याचे मुंडे म्हणाले.
शनिवारी (ता.३०) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे औरंगाबादेत आगमन झाले. त्यांचे क्रांती चौकात स्वागत करण्यात आले. दुसरीकडे राजकीय संघटनांकडून ठाकरे यांच्या सभेला विरोधच होत आहे. शुक्रवारी रिपब्लिकन युवा मोर्चाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सभा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र खंडपीठाने सदरील याचिका फेटाळून याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड सुनावला. दुसरीकडे राज यांच्या सभेसाठी औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी १६ अटी घातलेल्या आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…