राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कारासाठी यवतमाळच्या तीन शेतकऱ्याची निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 एप्रिल, :- कृषी विभागामार्फत सन 2017,2018 व 2019 या तीन वर्षात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अधिकारी यांचा सत्कार व राज्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 2 मे रोजी नाशिक येथे करण्यात आलेले आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा नाशिक येथे होणार आहे.
यवतमाळ तालुक्यातील शिवनी येथील प्रभाकर विठ्ठल ठाकरे यांची सन 2017 या वर्षाकरिता कृषी भूषण सेंद्रीय शेती या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. सन 2019 चे पुरस्कार अंतर्गत गाजीपूर ता. दारव्हा येथील जगदीश हरिदास चव्हाण यांची निवड उद्यान पंडित या पुरस्कारासाठी झालेली आहे. तसेच 2019 चे शेतीनिष्ठ शेतकरी आदिवासी गट या पुरस्काराकरिता खैरगाव (दे.) ता. पांढरकवडा येथील महेंद्र दौलत नैताम यांची निवड झालेली आहे. या तीन शेतकऱ्यांचा सत्कार नाशीक येथे करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्युब चॅनेल www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM यावर होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या युट्युब चॅनेलवर सबस्क्राईब करून पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे ऑनलाइन साक्षीदार व्हावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…