पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा.…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 एप्रिल, :- राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता रेमंड कंपनीचे विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 पर्यंत जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना, जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2021-22 व 2022-23 चा भौतिक-आर्थिक आढावा नियोजन सभागृह येथे घेतील. दुपारी 1.30 वाजता जिल्हा नियोजन कार्यकारी समितीच्या बैठकीस नियोजन भवन येथे उपस्थित. दुपारी 3 वाजता यवतमाळ शहर वाढीव पाणी पुरवठा योजना (अमृत) आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता जलजीवन मिशन आढावा बैठक. दुपारी 4.15 वाजता मनरेगा आढावा बैठक. सायंकाळी 4.45 वाजता खनिज विकास निधी आर्थिक प्रगती आढावा बैठकीस नियोजन भवन येथे उपस्थित. सायंकाळी 6.30 वाजता रेमंड विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी सकाळी 7.50 वाजता विश्रामगृह येथून समता मैदान (पोस्टल ग्राउंड कडे) प्रयाण. सकाळी 8 वाजता समता मैदान येथे आगमन व महाराष्र्ू दिन मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वाजता वाघापूर नाका ते हॉटेल गॅलक्सी पर्यंत रस्त्याचे गिट्टीकरण व डांबरीकरण व हॉटेल गॅलेक्सी ते मेडीकल कॉलेज गेटपर्यंत रस्त्याचे गिट्टीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता यवतमाळ येथील नाट्यगृह संकुलातील नविन बांधकामाची पाहणी, सकाळी 10 वाजता स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन केंद्र शुभारंभ. सकाळी 11 वाजता खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे उपस्थित. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता औरंगाबादकडे प्रयाण.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…