पुणे शहरात ब्रेक निकामी झाल्याने एसटी बसची धडक ; अपघातांनंतर वाहनांच्या रांगा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
धनकवडी (पुणे) :- धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलवरून जाणाऱ्या एस.टी. बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने उड्डाणपूलावरुन जाणाऱ्या एका चारचाकीसह, सहा ते सात दुचाकींना धडक दिली. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजता घडली. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सातारा – स्वारगेट बस (क्रमांक एमएच ०६ एस ८४६७) ही सातारा येथून सकाळी पुण्याकडे जाण्यास निघाली. दरम्यान मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता एसटी बस धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलावरुन जाताना अचानक एसटी बसचे ब्रेक न लागल्याने समोरच्या वाहनांना धडक देत बाजूच्या संरक्षक भिंतीला हँन्ड लाँक होऊन थांबल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान बालाजीनगर परिसरात कायम गर्दी असते. त्यामुळे उड्डाणपूलावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सहकारनगर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी क्रेनच्या साह्याने बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…