खासदारांच्या घरात चोरीचा प्रयत्न तिघेजण कुलूप तोडून बंगल्यातही पोहोचले पण..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर, 28 एप्रिल :- महाराष्ट्रातील एका खासदाराच्याच घरात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी ही घटना घडली. याप्रकरणी, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. धानोरकर यांच्या सूर्यकिरण या बंगल्यावर ही घटना घडली. शंकर नेवारे, तन्वीर बेग आणि रोहित इमलकर, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक करण्यात आली. काय आहे नेमकी घटना? चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी हा चोरीचा प्रयत्न करण्यापूर्वी चोरांनी घराची रेकी केली होती. घरामध्ये कोणीही नाही या उद्देशाने त्यांनी घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला.
चोरांनी मुख्य उद्देशाने धानोरकरांच्या सूर्यकिरण या बंगल्याच्या दाराचं कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सूर्यकिरण याच बंगल्यात आधी धानोरकरांचं कार्यालयही होतं. मात्र, आता त्यांचं कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय.
खासदार धानोरकर हे राहण्यासाठी हाच बंगला वापरतात. त्यामुळेच घरी कोणी नसल्याचं पाहून चोरांनी हा डल्ला मारल्याचं स्पष्ट होत आहे.
तर थेट खासदाराच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणात तिघांना अटक झाली आहे.
तसेच त्यांनी दोन घरफोड्या केल्या, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. अशी माहिती समोर आली आहे की, अटक करण्यात आलेल्यांची नावे शंकर नेवारे, तन्वीर बेग आणि रोहित इमलकर अशी आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली. खासदार धानोरकर यांच्या सूर्यकिरण या बंगल्यात कोणातेही मौल्यवान साहित्य नसल्याने चोरांचा डाव फसला. त्यामुळे धानोरकर यांना मोठं नुकसान झालं नाही. मात्र, बंगल्यात काहीच न मिळाल्याने संतापलेल्या चोरांनी बंगल्यात फार नासधूस केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…