मनसेला आणखी एक झटका ; औरंगाबाद मनसे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच आता मनसेला आणखी एक धक्का बसलाय. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
भाजपमध्ये जाहीर प्रवेश
आधीच पोलिसांकडून मनसेला सभेसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यात जमावबंदी लागू झाल्यामुळे मनसेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या सर्वात औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेच्या सभेवर मोठा परिणाम पडणार आहे. यातच आता सुहास दशरथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.
चार महिन्यांपूर्वी उचलबांगडी
सुहास दशरथे हे औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे मोठे नाव होते. त्यांच्या नेतृत्वात मनसेने जिल्ह्यात मोठी लोकप्रियता मिळवली होती. पण, पक्षांतर्गत कारणांमुळे चार महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सुमित खांबेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासूनच दशरथे पक्षावर नाराज होते. तसेच, ते इतर पक्षांच्या संपर्कातही होते. आता अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेस करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…