कोरोना काळात महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांवर सरकारी तिजोरीतून उपचार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनावरील उपचारांसाठी महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांची सरकारी तिजोरीतून बिलं भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक मंत्र्यांचा समावेश आहे.
या सर्व मंत्र्यांचा एकूण खर्च हा कोट्यवधी रुपयांचा आहे. याबाबत वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्रात कोरोना महामारीचं भयानक संकट असताना तसेच जनता या काळात रुग्णालयातील बेडसाठी धडपड करत असताना मंत्र्यांनी मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे या लाखो रुपयांच्या खर्चाची बिलं सरकारी तिजोरीतून भरण्यात आली आहेत. गेल्या दोन मंत्र्यांनी हे उपचार घेतले आहेत. या सर्व मंत्र्यांचा एकूण खर्च हा १ कोटी ३९ लाख रुपये इतका झाला आहे. या उपचार घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ९, काँग्रेसचे ६ तर शिवसेनेच्या ३ मंत्र्यांचा समावेश आहे.
कोणत्या मंत्र्यांचा समावेश आणि किती झाला खर्च….?
राजेश टोपे (राष्ट्रवादी) – ३४ लाख
नितीन राऊत (काँग्रेस) – १८ लाख
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) – १४ लाख
अब्दुल सत्तार (शिवसेना) – १२ लाख
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) – १२ लाख
छगन भुजबळ (राष्ट्रवादी) – ९ लाख
सुनील केदार (काँग्रेस) – ९ लाख
जयंत पाटील (राष्ट्रवादी) – ७ लाख
सुभाष देसाई (शिवसेना) – ७ लाख
अनिल परब (शिवसेना) – ७ लाख
कोणत्या आठ रुग्णालयांमध्ये घेतले उपचार….?
बॉम्बे हॉस्पिटल – ४१ लाख
लिलावती हॉस्पिटल – २६ लाख
ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल – १५ लाख
जसलोक हॉस्पिटल – १४ लाख
फोर्टिस हॉस्पटल – १२ लाख
अवंती हॉस्पिटल – ७ लाख
ग्लोबल हॉस्पिटल – ४ लाख
अनिदीप हॉस्पिटल – २ लाख

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….