४५ पदांसाठी होणार भरती ; आयोगाने मागवले अर्ज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पदभरतीसाठीचा अर्ज मागवण्यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आलं आहे. निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातल्या पदभरतीसाठी परिक्षार्थ्यांचे अर्ज मागवण्यात आले आहे.
४५ पदांसाठी ही भरती होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे परिक्षार्थ्यांना हा अर्ज आय़ोगाच्या अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. २२ एप्रिल २०२२ रोजी गुपारी दोन वाजल्यापासून १२ मे २०२२ रात्री ११.५९ वाजेपर्यंत परिक्षार्थ्यांना आपले अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

अराखीव खुल्या गटासाठी ३९४ रुपये परीक्षा शुल्क असेल तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ घटकांसाठी २९४ रुपये परीक्षा शुल्क आहे. परिक्षार्थ्यांना १२ मे २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षाशुल्क भरता येणार असून स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी १४ मे २०२२ ही अंतिम तारीख असेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..