“मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे तर माशिदीमध्ये का नाही….?” ; मनसेच्या मागणीला गृहमत्र्यांच एका वाक्यात उत्तर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला आहे. काही मशिदींनी पुढाकार घेत या मागणीचे स्वागत केले आहे.
मात्र, यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. नुकतंच हनुमान जयंतीदिनी या मुद्द्याचा राजकीय परिणाम झाल्याचे दिसून आले. मनसेनं आता भोंग्यांच्या मुद्द्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आणला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जवळपास सर्व मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, पंरतु मशिदीत सीसीटीव्ही आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“मंदिरांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करण्यासंदर्भात कोणी सूचना कोणी दिलेल्या नाहीत. मंदिरात जर कोणी स्वेच्छेनं, सुरक्षिततेच्या दृष्टीनं जर सीसीटीव्ही लावले असतील आणि अन्य बाकीच्या प्रार्थना स्थळांमध्ये ज्यांना सीसीटीव्ही बसवायचे असतील त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही. आपल्या स्वेच्छेनं त्यांनी निर्णय घ्यावा,” असं वळसे पाटील म्हणाले.

काय म्हणाले बाळा नांदगावकर?
“जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत, परंतु मशिदींमध्ये CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी,” असं बाळा नांदगावकर म्हणाले होते. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..