जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखले एका दिवशी दोन बालविवाह, नागरिकांनी बालविवाह बाबत दक्ष राहण्याबाबत आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रुई(तलाव) गावातील १५ वर्षीय बालिकेचा ता. हदगाव, जिल्हा नांदेड येथील व्यक्ती व महागाव तालुक्यातील काळी टेंभी येथील १६ वर्षीय बालिकेचा अमरावती येथील व्यक्ती सोबत रविवार दिनांक १७/०४/२०२२ रोजी विवाह नियोजित होता. याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षास गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे बालिकांच्या वयाची शहानिशा तातडीने महिला व बाल विकास विभागाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, देवेंद्र राजूरकर यांनी तातडीने शनिवारी रात्री रुई (तलाव) येथे दिग्रस पोलीस कर्मचारी व गावाचे सरपंच, पोलीस पाटील, आशासेविका व अंगणवाडी सेविका यांच्या द्वारे त्वरित भेट देऊन बालविवाह न करण्याच्या सूचना देण्यात आल्या व तसे हमीपत्र पालकाकडून घेण्यात आले तसेच नियोजित ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण कक्ष -नांदेड व चाईल्ड लाईन टिम पोहचल्याने लग्न वऱ्हाडी यांची भंबेरी उडाली व बाल विवाह टाळला, बालिकेला बाल कल्याण समिती यवतमाळ समक्ष हजर करून कायदेशीर बाबीची पूर्तता केल्या जाणार आहे.
तसेच काळी(टेंभी), ता. महागाव येथे रविवारी दिनांक १७/०४/२०२२ होणाऱ्या विवाहची पत्रिका प्राप्त झाली व उपवधू हि अल्पवयीन असल्याने तालुका प्रशासन व महिला बाल विकास विभागाचे अधिकारी हे विवाह स्थळी धडकले असता संबधितांनी आमचे लग्न नाही साखरपुडा करत आहे अशी उडवीउडवीची माहिती दिली व विवाह घडला नाही. कायदेशीर बाबीची पूर्तता करून बालिकेला बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात येणार आहे.
सदर कार्यवाही देवेंद्र राजूरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, प्रिती शेलोकार- तालुका संरक्षण अधिकारी, वनिता शिरफुले- सामाजिक कार्यकर्ता यांनी केली व दिग्रस व महागावचे पोलीस, गावाचे ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले.
“०१ जानेवारी २२ ते १७ एप्रिल २२ पर्यंत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने एकूण १० बालविवाह रोखले असून त्यापैकी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागरिकांनी बालविवाह बाबत सतर्क राहावे व बालविवाह बाबत माहिती असल्यास त्वरित चाइल्ड लाईन १०९८ वर माहिती द्यावी असे आवाहन श्रीमती ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.”
“०३ मे २०२२ रोजी अक्षय तृतीया आहे व हा शुभ मुहूर्त समजल्या जातो यादिवशी अधिकाधिक विवाह होतात यामध्ये बालविवाह चे प्रमाण देखील आहे अश्या वेळी नागरिकांनी दक्ष राहावे गावात बालविवाह होत असतील तर गावचे ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना माहिती द्यावी व बालविवाह रोखून बालकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यास मदत करावी असे आवाहन देवेंद्र राजूरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.”
जानेवारी २२- ०२ (०१ गुन्हा दाखल)
फेब्रुवारी २२- ०३
मार्च २२ – ०१
एप्रिल २२ – ०४

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..