आज शिवतीर्थावर मनसे नेत्यांना मिळणार “राज” आज्ञा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे गुढीपाडवा मेळाव्यानंतर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे.
मनसेच्या ह्या मुद्द्यामूळे अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील चर्चेपासून दूर राहिलेली मनसे आता पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. मनसेने उभा केलेला भोंग्यांचा मुद्दा हा राज्याच्या राजकारणातील सर्वांत चर्चेचा विषय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
राज ठाकरे पुन्हा आक्रमकरीत्या सक्रीय:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी गुढी पाडवा मेळावा, ठाण्यातील जाहीर सभा व त्यानंतर पुण्यातील महाआरती ह्या तीनही ठिकाणी प्रखर हिंदूत्ववादी भुमिका मांडल्याने ते पून्हा एकदा आक्रमक राजकारणाकडे वळत आहेत हे पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परीषदेमध्ये त्यांनी 5 जूनला अयाध्येला जाणार असल्याची घोषणा केली.
हे असू शकतात आजच्या बैठकीतील मुद्दे :-
5 जून रोजी होणाऱ्या अयोध्या दौऱ्याविषयी चर्चा व नियोजन
भोंग्याच्या वादावर चर्चा
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची आखणी

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..