आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या ; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘दिल्लीतील स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून दंकली घडवल्या जात आहेत,’ असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीसह देशातील अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय.
‘निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवल्या’
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “दिल्लीतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलणे हा भाजपच्या योजनेचा भाग आहे. देशातील दोन प्रमुख शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलींचे वातावरण तयार केले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी सुरू आहे,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला’
यावेळी संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. “दिल्लीप्रमाणे मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण करत आहात. मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही कुणालातरी पकडून हे काम दिलं आणि भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. राजकीय फायद्यासाठी दंगलींचे वातावरण निर्माण केले. यामुळे देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल,” असंही राऊत म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..