नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्यानं त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
यावेळी कोर्टानं त्यांना २२ एप्रिलपर्यंत आणखी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक केली होती. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
कोर्टात आज काय घटलं?
न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं नवाब मलिक यांना आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.
त्यामुळं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून न देता त्यांना फक्त ४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळं २२ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जर तत्पूर्वी जर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि काही निकाल आला तर मात्र हे चित्र बदलेलं अन्यथा पुन्हा २२ तारखेनंतर मलिकांना कोर्टासमोर हजर करावं लागेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..