ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे
राज्यातील सर्व शाळांमधील (Maharashtra School) पुस्तकांबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्याच्या पाठिवरचे ओझे कमी होणार आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे.
येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीसाठी राज्यातील सर्व शाळामध्ये नियम लागू होणार आहेत.
त्याचबरोबर इयत्ता दुसरीसाठी 101 तालुक्यात एकात्मिक पुस्तके लागू होणार आहेत.
या नव्या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारकडून सर्व तयारी सुरु आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा पुस्तकांचा भार कमी होणार आहे.
दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील न पेलवणारा पुस्तकांचा भार आता कमी करण्यात येणार आहे.
याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यादृष्टीने कृतीशील पावले टाकण्यात येत आहेत.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय समितीकडून शिफारस करण्यात आली होती.
यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..