भोंग्या बाबत मोठा निर्णय होणार ; पोलीस महासंचालकांची तातडीची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले असताना आता प्रशासकीय पातळीवरही बैठकांना वेग आला आहे. भोंग्यांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी गृहखातं सज्ज झालंय.
सर्व जिल्हा प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस महासंचालक लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत भोंगा आणि लाऊड स्पीकर संदर्भातील काही निर्णय घेण्यात येणार असून सध्या सर्व मार्गदर्शक सूचनाचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यभर भोंग्यांवरून राजकारण तापलं असताना नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांनी सर्व भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता राज्याच्या गृहखात्यानेही या प्रकरणावर ठोस पावलं उचलली आहेत. त्यामुळे सर्व धर्मियांना भोंगा किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य असणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.
राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत मुस्लीम समाजाला मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर राज्यभरात आणि देशभरात राजकारण तापलं आहे. मुस्लीम समाजानेही भोंगे खाली उतरवण्यास मनाई केल्यामुळे नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांनी सगळे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वधर्मियांच्या भोंग्यांना परवानगीची गरज आहे अन्यथा कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाकडूनही पावले उचलली जात आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक हे सर्व जिल्हा प्रमुख पोलिसांची बैठक घेणार असून त्यामध्ये भोंग्याच्या वादाबद्दल चर्चा होणार असल्यातं समजतंय. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..